कोरोनावर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय म्हणाले उद्धव ठाकरे??

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


                     

स्थैर्य, दि.२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यामध्ये केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यासह आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सुद्धा उपस्थिती नोंदवली. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी या बैठकीचे आयोजन केले. यात महाराष्ट्र आणि दिल्लीसह राजस्थान, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती वाइट आहे. सध्या देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 91.77 लाखांवर गेला आहे.

व्हॅक्सीन वेळेवर पुरवण्यासाठी टास्क फोर्स -उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या राज्याची कैफियत पंतप्रधानांसमोर मांडली. यामध्ये बोलताना ते म्हणाले, की सीरम इंस्टीट्यूटचे CEO अदार पूनावाला यांच्या सलग संपर्कात आहोत. सोबतच, राज्यात वेळेवर व्हॅक्सीन वाटण्यासाठी टास्क फोर्स सुद्धा तयार करण्यात आले आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट असताना 10 नोव्हेंबर रोजी 8600 रुग्ण सापडले होते. पण, हळू-हळू संक्रमितांच्या संख्येत घट होत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर दिल्लीच्या प्रदूषणाचा वाइट परिणाम झाला होता. दरम्यान, केजरीवालांनी तिसरी लाट जात नाही तोपर्यंत रुग्णालयांत 1000 अतिरिक्त ICU बेड राखीव ठेवण्याचे अपील केंद्र सरकारकडे केले आहे.

प्रताप सरनाईकांचा मुलगा विहंग सरनाईकांना ईडीने घेतले ताब्यात, चौकशीसाठी मुंबईला रवाना

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत ही 9 वी बैठक

या बैठकीत सहभागी झालेल्या इतर नेत्यांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि हरियाणाचा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा समावेश आहे. देशात 25 मार्च रोजी झालेल्या लॉकडाउननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत. पंतप्रधानांनी अशा स्वरुपाची चर्चा करण्याची ही 9 वी वेळ आहे. यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी बैठक झाली होती त्यामध्ये 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!