दैनिक स्थैर्य | दि. २० जून २०२४ | फलटण |
ग्रामीण जागरुकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीकन्यांचे हिंगणगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक श्री. पवार, कृषी सहाय्यक श्री. नेवसे, गावच्या सरपंच सौ.दिपिका संदीप भोईटे, उपसरपंच श्री. वैभव कल्याण भोईटे, प्रगतशील शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, पुढील १८ आठवड्यांमध्ये राबवण्यात येणार्या शेतीविषयक प्रात्यक्षिक, गटचर्चा, जनावरांचे लसीकरण, वृक्षारोपण, शेतकरी -शास्त्रज्ञ चर्चा, कृषी दिन, इ. कार्यक्रमाविषयी थोडक्यात कृषीकन्यांमार्फत माहिती देण्यात आली. हे कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी आपले सहकार्य व मार्गदर्शन मिळावे, अशी विनंती केल्यानंतर सर्वांनी अनुमती दिली.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या लोणकर प्रतीक्षा, वाघमारे संजना, सावंत मयुरी, पावणे अर्पिता, नाळे अनुजा, अभंग साक्षी, बोराटे शारदा व बोडके भाग्यश्री या पुढील कार्यक्रम राबवणार आहेत. तसेच शेतकर्यांचे अनुभव, त्यांच्या शेती पद्धतीचा सखोल अभ्यास करणार आहेत.