जमिनीच्या व्यवहारावरून महिलेचा विनयभंग; तिघांना पोलीस कोठडी


दैनिक स्थैर्य | दि. २० जून २०२४ | फलटण |
फलटणमधील लक्ष्मीनगर येथे राहणार्‍या महिलेचा जमिनीच्या व्यवहारातील पैशाच्या कारणावरून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद महिलेने फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

कुंडलिक वसंत नेटके, संदीप कुंडलिक नेटके व वैभव कुंडलिक नेटके (सर्व रा. नाईकबोमवाडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणाची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, लक्ष्मीनगर, फलटण (ता. फलटण, जि. सातारा) येथे दि. १४ जून २०२४ रोजी कुंडलिक वसंत नेटके, रेखा वसंत नेटके, संदीप कुंडलिक नेटके व वैभव कुंडलिक नेटके (सर्व रा. नाईकबोमवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी जमिनीच्या व्यवहारातील झालेल्या पैशाच्या कारणावरून फिर्यादी महिलेचा घरात प्रवेश करून त्यातील कुंडलिक वसंत नेटके यांनी फिर्यादीचा विनयभंग केला. तसेच त्याने तिची तीन तोळ्यांची सोन्याची मोहनमाळ काढून घेतली, तसेच त्याने फिर्यादीच्या मुलीस मारहाण केली व रेखा वसंत नेटके, संदीप कुंडलिक नेटके, वैभव कुंडलिक नेटके यांनी शिवीगाळ केली व कुंडलिक नेटके याने पैसे नाही दिले तर एकाएकाला संपवून टाकतो, अशी धमकी दिली तक्रार पोलिसात दिली आहे.

या प्रकरणी सपोनि नितीन शिंदे अधिक तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!