वाईच्या तर्कतीर्थ जोशी आयटीआयला ‘उत्कृष्ट संस्था’ पुरस्कार जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागातर्फे दिला जाणारा पुणे विभागातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) पुरस्कार वाई येथील तर्कतीर्थ जोशी आयटीआयला जाहीर झाला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ३० मार्च : वाई येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) राज्य शासनाचा ‘उत्कृष्ट आयटीआय’ पुरस्कार जाहीर झाला आहे. शासनाच्या निकषांवर खरी उतरत या संस्थेने पुणे विभागातून हा बहुमान पटकावला आहे.

१ हजाराहून अधिक संस्थांमधून निवड

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने नुकतेच हे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यासाठी शासनाने एका विशेष राज्यस्तरीय समितीची स्थापना केली होती. या समितीने राज्यातील ४१९ शासकीय आणि ५८८ खासगी अशा एकूण १ हजार ७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या कामकाजाची सर्वंकष तपासणी करून या पुरस्कारांची घोषणा केली.

पीपीपी मॉडेलची प्रभावी अंमलबजावणी

वाई येथील तर्कतीर्थ जोशी आयटीआयने ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ (पीपीपी) योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली आहे. या माध्यमातून संस्थेमध्ये नव्याने चार ट्रेड सुरू करण्यात आले आहेत. या पीपीपी मॉडेलमध्ये ‘गरवारे फुलफ्लेक्स इंडिया लिमिटेड’ हे इंडस्ट्री पार्टनर म्हणून काम पाहत असून, किरण बाबर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. याच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत संस्थेला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!