प. पू. गोविंदकाका उपळेकर महाराजांचा पालखी दिंडी सोहळा ८ जुलै रोजी निघणार


दैनिक स्थैर्य | दि. १ जुलै २०२४ | फलटण |
प. पू. गोविंदकाका उपळेकर महाराजांचा पालखी / दिंडी सोहळा गेली ४९ वर्षांपासून डिस्कळ, ता. खटाव येथून पुढे फलटणमार्गे पंढरपूरकडे जात आहे. याही वर्षी हा दिंडी सोहळा दिनांक ८ जुलै २०२४ रोजी दुपारी १.०० वाजता डिस्कळ येथून निघणार आहे.

हा दिंडी सोहळा दि. ९ जुलै २०२४ रोजी फलटण येथे मुक्काम करून पुढे दुसर्‍या दिवशी सकाळी ८.०० वाजता पंढरपूरकडे रवाना होईल. फलटण व त्या परिसरातील प. पू. गोविंद काकांच्या भाविक भक्तांनी दिंडी सोहळ्यात सामील होण्यासाठी आपले नाव प. पू. गोविंदकाका उपळेकर महाराज समाधी मंदिर संस्थेमध्ये नोंद करावे, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ७०२८७२८२७६/९६२३८१२३८५ या नंबरवर संपर्क करावा.


Back to top button
Don`t copy text!