पुणे विभाग पद्वीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान


 

स्थैर्य, फलटण, दि.२८ : महाराष्ट्र विधान परिषद पुणे विभाग पद्वीधर आणि शिक्षक मतदार संघातील प्रत्येकी एका जागेसाठी मंगळवार दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होत असून फलटण तालुक्यात शिक्षक मतदार संघासाठी 4 आणि पद्वीधर मतदार संघासाठी 16 मतदान केंद्रे निश्‍चित केली आहेत. फलटण तालुक्यात शिक्षक मतदार संघात 771 आणि पद्वीधर मतदार संघात 8924 मतदार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. 

शिक्षक मतदार संघातील एका जागेसाठी 35 आणि पद्वीधर मतदार संघातील 1 जागेसाठी 62 उमेद्वार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत त्यांना सातारा जिल्ह्यातून पद्वीधर मतदार संघात 59072 मतदान करणार आहेत. फलटण तालुक्यात शिक्षक मतदार संघासाठी मुधोजी हायस्कूल फलटण येथे 1 आणि वाठार निंबाळकर व निंबळक येथे जिल्हा परिषद प्रा. शाळा येथे प्रत्येकी 1 आणि सौ. वेणुताई चव्हाण हायस्कूल तरडगाव येथे 1 अशी एकुण 4 मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. तर पद्वीधर मतदार संघासाठी फलटण शहरात मुधोजी हायस्कूल येथे 7, वाठार निंबाळकर येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेत 3, निंबळक येथे जिल्हा परिषद प्रा. शाळेत 4 आणि तरडगाव येथे सौ. वेणुताई चव्हाण हायस्कूल येथे 2 अशी एकुण 16 मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. 

पद्वीधर व शिक्षक मतदार संघातील मतदारांना मतदार यादीतील आपले नाव व मतदार क्रमांक शोधण्यासाठी https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1 या लिंकचा वापर करावा असे सुचविण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!