दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२१ । बोरगाव । कोरेगाव तालुक्यातील विखळे गावचे सुपुत्र असणारे विठ्ठल आबा अडागळे हे बोरगाव हायस्कुल बोरगाव विद्यालयाचे शिपाई मामा असून आपल्या नावीन्यपूर्ण कलेने लोकांची मने जिंकत आहेत. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नजीक असणारे बोरगाव हायस्कुल बोरगाव येथील शिपाई मामा विठ्ठल अडागळे हे गेली कित्येक वर्षे आपल्या विनोदी अभिनयाने तसेच सुमधूर अशा आपल्या आवाजाने लोकांची मने जिंकत आहेत.
तसे पाहिले तर विखळे गावचे सुपुत्र असणारे विठ्ठल आबा अडागळे हे एक शिपाई म्हणून काम करतात त्याचबरोबर त्यांनी कित्येक चित्रपटात अभिनय साकारला आहे तसेच उनाड पोर भन्नाट गावकरी या वेब सिरीज मधील तर बहिरा आबा ही त्यांची भूमिका तर अक्षरशः लोकांनी डोक्यावर घेतली आपल्या सुमधुर आवाजाने वेळोवेळी भजनाची साथसंगत करत असतात माळकरी असणारे विठ्ठल आबा हे आपल्या शांत व संयमी स्वभावाने लोकांची मने जिंकतात परिस्थिती हलाखीची असून सुद्धा चेहऱ्यावर सतत हास्य असणारे विठ्ठल आबा यांना विविध माध्यमातील पुरस्कार व सन्मान देण्यात आले आहेत अशा गरीब अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला वाठार स्टेशन पंचक्रोशीतील नागरिक अक्षरशः डोक्यावर घेत आहेत.