शिवसेनेच्या सातारा जिल्हा समन्वयकपदी विराज खराडे यांची नियुक्ती


दैनिक स्थैर्य । 4 जून 2025। फलटण । शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या सातारा जिल्हा समन्वयकपदी विराज खराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विराज खराडे यांना नियुक्तीचे पत्र दिले.

याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, नवनियुक्त जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले, राजेंद्रसिंह यादव आदी उपस्थित होते. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल. तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास नियुक्ती पत्रामध्ये शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केला आहे.

खराडे यांनी 2008 पासून शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली होती. जनतेच्या प्रश्नाबाबत अनेक आंदोलने त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली होती. त्यानंतर पक्षांतर्गत स्थित्यंतरे अनुभवत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आदर्शानुसार एकनाथ शिंदे यांचे कार्य सुरु त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सोहळ्यात शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्याने त्यांची समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल विराज खराडे यांचे शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, वारकरी महामंडळाचे पदाधिकारी, सदस्यांतून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!