चिमणराव कदम साहेबांचा वारसा जोपासणारे “सह्याद्री” भैय्या


फलटण तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सहकारी क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे कार्यरत असलेले जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री (भैय्या) कदम यांचा आज ४ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे सह्याद्री भैय्या युवा मंचचे अध्यक्ष पै. सुरज कदम यांनी…..

मागील आठवडाभरात फलटण तालुक्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामे सुरू आहेत. त्यापूर्वीच्या काळात जम्मू-काश्मीरच्या पहेलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे अनेक मरण पावले. या सामाजिक आणि नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री कदम यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे.

फलटण तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्वर्गीय चिमणराव उर्फ सूर्याजीराव कदम यांनी दिलेला आदर्श सह्याद्री कदम यांच्या कार्यात स्पष्ट दिसतो. सह्याद्री कदम नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देत आहेत. त्यामुळे फलटण तालुक्यातील गावोगावी त्यांची ओळख एक स्वातंत्र्याच्या ध्येयाने भरलेली आहे. बालवृद्ध सर्वच वयोगटांमध्ये त्यांची लोकप्रियता आणि मित्रत्व प्रस्थापित झाले आहे.

सह्याद्री कदम यांची व्यक्तिमत्त्व लोकांशी मृदु संवाद साधण्यावर आधारित असून, त्यामुळे त्यांचे अनेक मित्र आहेत. या सामाजिक बांधिलकीमुळे त्यांचे कार्य फलटण तालुक्यात विशिष्ट स्थान प्राप्त झाले आहे. या काळातही त्यांनी अखंडपणे निःस्वार्थ भावनेने कार्य करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या वाढदिवसानिमित्त कोणत्याही भव्य कार्यक्रमाऐवजी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अति साधेपणाने कामकाज पार पडत आहे. फलटण तालुक्यातील युवकवर्गासाठी सह्याद्री कदम हा एक आशास्थान ठरला असून, त्यांचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील वाटा यापुढेही चालू राहणार आहे, ही आशा व्यक्त केली जाते.

सह्याद्री भैय्या युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष पै. सुरज हिंदुराव कदम पाटील यांनी युवा नेते सह्याद्री कदम यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या भविष्यातील वाटचालीस यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!