नागठाणे येथे जिल्हाधिकारी आदेशाचा भंग; दोघांवर गुन्हा 

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि.०७: नागठाणे (ता.सातारा) येथे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून विदेशी दारू विकत असलेल्या अल्फा परमिट रूमव बिअर बार मधील दोघांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत भिकोबा माने (वय.४९, रा.मांडवे, ता.सातारा) व प्रवीण अरविंद मोहिते (वय.२८,रा.मारंगवस्ती,नागठाणे, ता.सातारा)असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताची नावे आहे.

गुरुवारी सकाळी १०.३० वाजता बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी नागठाणे येथे पेट्रोलिंग करत असताना येथील सेवारस्त्यालगत असलेल्या अल्फा परमिट रूम व बिअर बार येथून एक इसम विदेशी दारूची बाटली घेत असल्याचे निदर्शनास आले.यावेळी पोलिसांनी बारचालक चंद्रकांत माने व कामगार प्रवीण मोहिते या दोघांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ताब्यात घेतले.बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ. सागर वाघ,हवालदार विजय साळुंखे,विशाल जाधव ,उत्तम गायकवाड व चालक कपिल टीकोळे यांनी ही कारवाई केली.

Back to top button
Don`t copy text!