हणमंतवाडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा. समवेत श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर व इतर. |
स्थैर्य, फलटण, दि.२८ : शासनाच्या समृद्ध ग्राम योजनेमध्ये समावेश झालेल्या फलटण तालुक्यातील हणमंतवाडी गावाला सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी करुन ग्रामस्थांसह अधिकारी व कर्मचार्यांशी संवाद साधला. यावेळी फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, गटविकास अधिकारी सौ.अमिता गावडे यांची उपस्थिती होती.
लायन्स क्लब फलटण गोल्डनचे कार्य आदर्शवत: लायन रवींद्र देशपांडे
यावेळी विनय गौडा यांनी हणमंतवाडी येथील देशातील पहिला जागेसहित बांधकाम करून देणारा 120 घरांचा घरकुल प्रकल्प तसेच वृक्षलागवड, जलसंधारण, जिल्हा परिषद शाळा सुधारणा, रस्ते, वीज, पाणीपुरवठा व्यवस्था, गावात राबलेल्या नरेगाच्या विविध योजना, नियोजित ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम जागा पाहणी, तलाठी कार्यालय इमारत जागा पाहणी, पोलीस दूरक्षेत्र इमारत जागा पाहणी आदींची पाहणी करुन ग्रामस्थांसह संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.