उद्योजक राम निंबाळकरांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने विजयसिंह मोहिते – पाटील निंबळकमध्ये; विविध चर्चांना उधाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 24 डिसेंबर 2023 | फलटण | फलटण तालुक्याचे सुपुत्र तथा राज्यातील प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त निंबळक येथे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी खासदार विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या शुभहस्ते मंगळवार, दि. 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या शुभहस्ते फलटण तालुक्यात येणार असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

आगामी काही महिन्यांवर लोकसभा येवून ठेपली आहे. त्यामध्ये मोहिते – पाटील कुटुंबाची महत्वाची भूमिका ही माढा लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे मोहिते – पाटील यांनी पुन्हा संपर्क मोहीम सुरू करण्यात आली असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

या कार्यक्रमास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुभाष शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता व साखरवाडीचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांची प्रमुख उपस्थिती आहे.

सदरील कार्यक्रम हा मंगळवार, दि. 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी निंबळक येथे संपन्न होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!