
स्थैर्य, वाई, दि.१४: वेळे (ता वाई)येथील आराम रिजन्सी आणि पिंजरा कला केंद्राचे संस्थापक मालक विजय (बापू) यादव यांचे (वय६५ ) अल्पशा आजाराने निधन झाले.मागील काही दिवसांपासून बापू यादव आजाराने त्रस्त असल्याचे पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.
विजय यादव यांनी सातारा जिल्ह्यात तमाशा कलावंतांसाठी हक्काचे पिंजरा कला केंद्र स्थापन केले. यामुळे भटक्या व हातावर पोट असणाऱ्या तमाशा कलावंतांसाठी हक्काचे तमाशा थिअटर उपलब्ध झाले. यानंतर ४०० पेक्षा अधिक कलाकारांना हक्काचा उपजिविकेसाठी आधार मिळाला. त्याचबरोबर कला, क्रिडा आणि साहित्य क्षेत्रात विजयराव बापू यांचे नाव घेतले जाते. राजकीय क्षेत्रात सगळ्या पक्षाचा विजय बापू यादव यांचे नाव मोठ्या प्रमाणात परिचित होते. मुंबई कुर्ला येथे मोठ्या राजकीय दिग्गज व्यक्तींबरोबर त्यांनी आपली कारकीर्द घालवली. त्यानंतर वेळे येथे हॉटेल आराम रिजन्सी व पिंजरा कला केंद्र इतर लघुउद्योग काढून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध देण्याचे काम ही विजय बापू यादव यांनी केले. वीर जवान यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, मराठा आरक्षण आरक्षणात सक्रिय सहभाग ,पायी जाणाऱ्या दिंड्या जेवणाची व्यवस्था, गरिबांसाठी मोफत मंगल कार्यालय आदि माध्यमातून तरी लोकसेवा केली. त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा तीन मुली नातवंडे सात भाऊ असा एकत्रित परिवार आहे. वेळ येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सर्व स्तरातील समाज सहभागी झाला होता.