
दैनिक स्थैर्य | दि. 03 मार्च 2025 | फलटण | फलटण तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ नेते स्व. सुभाष शिंदे यांचे प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला आहे. आज दि. ०३ मार्च रोजी शिंदेवाडी येथील शुभ लौन्स येथे सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ह. भ. प. नम्रता महाराज कर्वे यांचे फुलांचे कीर्तन संपन्न होणार असून दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी स्व. सुभाष शिंदे यांच्या स्मृतीस उजाळा देत आदरांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चेतन शिंदे यांच्यासह शिंदे कुटुंबीयांनी केले आहे.