निकोप हॉस्पिटलमध्ये रूग्णांच्या नातेवाईकांकडून शिवीगाळ; डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. ०३ : फलटण येथील डॉ. जे. टी. पोळ यांच्या निकोप हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रूग्णाची काल रात्री मयत झालेली होती. परंतू मयत होवून सुध्दा मयताला अंत्यसंस्कारासाठी न हलवल्याने संतापलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉ. जे. टी. पोळ यांच्या निकोप हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना आणि अधिकार्यांना शिवीगाळ केली असल्याचे समोर येत. घटनास्थळी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे हे दाखल झाले असुन पुढील तपास करीत आहेत.

या बाबत प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप म्हणाले की, संबंधित प्रकाराची माहिती डॉ. जे. टी. पोळ यांच्या कडून मिळालेली आहे. पोलीस प्रशासन पुढील कार्यवाही करित आहे. लवकरात लवकर संबंधितांवर पोलीस प्रशासन कडक कारवाई करेल.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!