वंचित बहुजन आघाडी पालिका निवडणुका लढवणार – भीमराव घोरपडे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । सातारा । सातारा जिल्हा पूर्व नगरपालिकेच्या निवडणूका वंचित बहुजन आघाडी ताक्तीने लढणार असल्याची माहिती वंचित आघाडीचे नवनिर्वाचित सातारा पूर्व अध्यक्ष भीमराव घोरपडे यांनी दिली आहे.

भीमराव घोरपडे म्हणाले, “शासनाने मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक ओबीसी समाजाला कोणतेच आरक्षण राहिले नाही.याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलने, मोर्चे काढून ओबीसींना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केला जात आहे.वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व देऊन वंचितांसाठी लढा सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील पूर्व भागातील सर्व नगरपालिकेच्या निवडणूका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार आहे.सर्व जागावर सक्षम उमेदवार देऊन पूर्ण ताकतीनिशी निवडणूक लढवणार असल्याचे घोरपडे म्हणाले. यावेळी नवनिर्वाचित सातारा पूर्व संघटक तुकाराम गायकवाड,शाहू फुले आंबेडकर राजकारणातील चाणक्य अशोक भोसले, वंचित कार्यकर्ता व नवनिर्वाचित संघटक रणजीत मोहिते, ज्येष्ठ नेते आनंदराव आढाव सर, माण तालुका अध्यक्ष युवराज भोसले, डी पी अहिवळे, अरविंद आढाव, विकास निकाळजे,लोंढे महिला शहर अध्यक्ष सपनाताई भोसले, महिला शहर उपाध्यक्ष मयुरी गायकवाड, महिला तालुका अध्यक्ष आश्विनी अहिवळे आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!