वैशाली शिंदे यांची मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीवर निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. २२ : आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैशाली शिंदे यांची रेल्वे मंत्रालयाच्या मध्य रेल्वे विभागाच्या रेल्वे सल्लागार समितीवर निवड करण्यात आलेली आहे, अशी माहिती सौ. वैशाली शिंदे यांनी सोशल मीडिया द्वारे दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य रेल्वेच्या सल्लागार समिती वर निवड झाल्यानंतर सौ. वैशाली शिंदे यांचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश मधील काही भाग असे असणार आहे. सदरील निवड ही केंद्रीय रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल यांच्या आदेशाने झालेली आहे.

सर्वसामान्य कुटुंबातून येऊन काम करत असताना चार राज्यात असणाऱ्या मध्य रेल्वेच्या विभागांमध्ये सल्लागार म्हणून नेमणूक केल्याबद्दल वैशाली शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितिन गडकरी व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे विशेष आभार मानले. यासोबतच माहिती व जनसंपर्क मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे यांचे आभार वैशाली शिंदे यांनी निवडीनंतर मानले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!