
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि. १४: उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हिड लसीकरण मोहिम चालु असून सदर लसीकरण केंद्रास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली, यावेळी येथील डॉक्टर, नर्स तसेच लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून सदरची लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ. संजय कुंभार, डी.बी.जाधव, हंबीरराव जाधव, सोमनाथ जाधव, सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव, संग्रामसिंह पलंगे, अजित जाधव, प्रमोद पुजारी, सुधीर जाधव, सुधाकर जाधव, दिगंबर भिसे आदी उपस्थित होते.
