स्थैर्य,लंडन, दि ६: ब्रिटनमध्ये फिझर/ बायोन्टेक कंपनीची करोना लस सर्वात प्रथम ज्या व्यक्तींना दिली जाणार आहे, त्यात 94 वर्षीय महाराणी एलिझाबेथ आणि 99 वर्षीय युवराज फिलीप यांचा समावेश असणार आहे.
या लसीकरणासाठी फिझर/ बायोन्टेकच्या लसीचा साठा ब्रिटनमध्ये येऊन पोहोचला आहे. आता ही लस वयाची 80 वर्षे ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सर्वप्रथम दिली जाणार आहे. मंगळवारपासून हे लसीकरण सुरू होणार आहे.
ब्रिटनमध्ये सोशल मिडीयावरून या लसीच्या विरोधात मते व्यक्त केली जात आहेत. या लसीकरणामध्ये हे विरोधी मत हाच मोठा अडथळा असणार आहे. ब्रिटनच्या इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे लसीकरण अभियान असणार आहे. लोकांमधील संभ्रमावस्था दूर करण्याच्या हेतूनेच महाराणी एलिझाबेथ सर्वप्रथम ही लस स्वतः घेणार आहेत.
जिल्ह्यातील 173 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 9 बाधितांचा मृत्यु
करोना विरोधी लसीचा पहिला साठा बेल्जियममधून ब्रिटनमध्ये आला आहे. त्यात 8 लाख डोस आहेत. ब्रिटनने फिझर/ बायोन्टेक लसीचे 40 दशलक्ष डोसची ऑर्डर दिली आहे. लसचा या साठ्यातून 21 दिवसात 2 कोटी नागरिकांना 2 डोस देण्यासाठी पुरेशी असणार आहे.
याशिवाय अन्य लसीचे 300 दशलक्ष डोस उपलब्ध होण्यासाठीही करार केला जातो आहे. अर्थात लसीला मान्यता मिळाल्यानंतरच ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.