रामायणाबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल सैफ अली खानने मागितली माफी


स्थैर्य,मुंबई, दि ६: सैफ अली खानने रामायणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडला होता. सैफने त्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. सैफ अली खान माफी मागताना म्हणाला, ‘मला असं समजलं की, मी एका मुलाखतीमध्ये अनावधानाने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यासाठी भगवान राम हे नेहमीच हीरो आहेत. मी त्यांचा मनापासून आदर करतो. आदिपुरुष हा सिनेमा ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ ही भावना दाखवण्यासाठी बनवणार आहोत.’ 

काय म्हणाला होता सैफ? 

अलीकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने ‘आदिपुरुष’मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हटले की, या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. तो म्हणाला, ‘ एक अशा राक्षस राजाची भूमिका वठवणं रंजक आहे. यामध्ये सीतेच्या अपहरणानंतर झालेली रावणाची रामासोबत लढाई सूड उगविण्यात दाखवली जाईल, जी लक्ष्मणाने रावणाची बहिण शूर्पणखेचं नाक कापल्यामुळे सुरू झाली होती. सैफच्या या प्रतिक्रियेवर भाजप आमदार राम कदम यांनीही टीका केली होती. 

एका “जबरदस्त” अभिनेत्याला गमावले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

काय म्हणाले होते राम कदम ? 

भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी सैफ अली खानवर जोरदार टीका केली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की, ‘आदिपुरुष नावाच्या चित्रपटात सैफ रावणाची भूमिका साकारत आहेत. यामध्ये सैफ अली खान म्हणत आहेत की ते रावणाच्या भूमिकेला हिरोप्रमाणे प्रस्तुत करतील. ते म्हणत आहेत की, लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापल्याने त्या बदल्याच्या भावनेतून रावणाने माँ सीतेचं हरण केलं, प्रभू रामचंद्रांबरोबर युद्ध केलं. या घटनेला ते न्याय देणार आहेत. सैफ अली खान याचं समर्थन करत असतील, तर याचं समर्थन कसं होईल?’ हा सवाल उपस्थित करत राम कदम यांनी उपस्थित केला होता, ‘प्रभू रामचंद्रांनी धर्म स्थापित केला, आमची आस्था आणि श्रद्धा आहे. राम आणि रावणाची लढाई ही धर्म आणि अधर्म यांच्यातील आहे. ते अधर्माला उचित सिद्ध करत आहेत. आमच्या आस्था आणि श्रद्धेशी कोणी खेळू शकत नाही.

तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ फेम ओम राऊत आता ‘आदिपुरुष’ हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झालेलं नाही. यामध्ये भगवान रामांची भूमिका बाहुबली ‘प्रभास’, सीतेच्या भूमिकेत कृती सॅनन आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. सैफच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावरही नाराजी पसरली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!