दैनिक स्थैर्य | दि. २८ मे २०२४ | फलटण |
महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हा एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “गुढीपाडवा पट वाढवा” या अभियानांतर्गत राज्य शासनाच्या विविध योजना व सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची वैशिष्ट्ये दर्शविणार्या फ्लेक्सचे अनावरण २७ मे रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. याशनी नागराजन यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हा एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाचे राज्याध्यक्ष श्री. विकास खांडेकर सर, जिल्हाध्यक्ष श्री.जोतीराम जाधव सर, जिल्हा संघटक श्री. विजय मोरे सर व सातारा तालुकाध्यक्ष श्री. नंदकुमार कदम सर उपस्थित होते.
याप्रसंगी श्री. नागराजन यांनी फ्लेक्स पाहून आनंद व्यक्त केला. तसेच सेवा मंचाच्या सर्व पदाधिकार्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.