मतमोजणीनंतर मंत्रिमंडळ विस्तार : ना. देवेंद्र फडणवीस; ना. अजितदादा पवारांच्या कोट्यातुन फलटणला पद मिळणार ?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 28 मे 2024 | फलटण | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “द लल्लनटॉप” या चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कोट्यातून फलटणला पद मिळणार कि ना. अजितदादा पवार हे काही वेगळा निर्णय घेणार ? याकडे आता फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यामध्ये उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे सत्तेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर फलटणला पुन्हा लाल दिवा मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या. त्यानंतर अनेक ज्युनिअर मंत्र्यांचे शपथविधी झाले परंतु फलटणला कोणतेच पद मिळाले नाही. त्यामुळे आता विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यात तरी फलटणला लाल दिवा मिळणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभेची भूमिकेमुळे अडसर?

लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघात जी भूमिका फलटणकरांनी घेतली होती. त्या भूमिकेमुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात फलटणला मिळण्यामध्ये अडसर ठरणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. महायुतीने अर्थात भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने जर कठोर भूमिका घेतली तरी सुद्धा फलटणला लाल दिवा मिळण्यामध्ये अडसर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

ना. अजितदादांच्या आदेशानेच लोकसभेची भूमिका?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत फलटणकरांनी जी भूमिका घेतली होती. त्या भूमिकेच्या मागे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचा आदेश असल्याची चर्चा दबक्या आवाजात फलटणमध्ये सुरु आहेत. त्याला कारण सुद्धा अनेक आहेत. त्यापैकी प्रमुख म्हणजे बारामतीचे पाणी असल्याचे मत व्यक्त होताना दिसून येत आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची जाहीर सभा हि फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झाली असल्याचे मत व्यक्त होताना दिसून येत आहे.


Back to top button
Don`t copy text!