केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ .कराड यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात मंत्री कार्यकर्ता संवाद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.२१ जानेवारी २०२२ । मुंबई । भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘ मंत्री – कार्यकर्ता ‘ संवाद कार्यक्रमात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी भाग घेतला. यावेळी डॉ. कराड यांनी  नागरिकांचे प्रश्न, तक्रारी याबाबत निवेदने स्वीकारली.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उद्योग, व्यावसायिक आदी विविध घटकांची मतेही डॉ. कराड यांनी जाणून घेतली. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, राज पुरोहित, अर्थ आघाडीचे संयोजक मिलिंद कानडे, उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, माजी आ. अतुल शाह, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!