
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, दि.१७: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण झाली आहे. गडकरींनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि प्रोटोकॉलचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी ट्विटरवरून केलं आहे. गडकरी सध्या विलगीकरणात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी गृहमंत्री अमित शहांसह केंद्रातल्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
‘काल मला अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माझी प्रकृती आता चांगली आहे. तुमचे आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्यासोबत आहेत. मी सध्या विलगीकरणात आहे,’ असं गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि
नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
