केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची WHOच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती


स्थैर्य, नवी दल्ली, दि. 20 : भारतासाठी अभिमानास्पद बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २२ मे पासून ते पदभार सांभाळणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

भारताने कोरोनाच्या लढ्यात उत्तम कामगिरी केली आहे. विशाल लोकसंख्येच्या देशात अजूनही कोरोनाचा प्रसार म्हणावा इतका झाला नाही. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही युरोपीय देशांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे भारताने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर १९४ देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्याही केल्या आहेत.

या जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. क्षेत्रीय समुहांमध्ये या कार्यकाळी मंडळाचं पद एका वर्षासाठी रोटेशनवर देण्यात येतं. तसंच २२ मे पासून सुरू होणाऱ्या पहिल्या वर्षासाठी हे पद भारताकडे देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. डॉ. हर्षवर्धन हे जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा घेणार आहेत. सध्या डॉ. नकतानी हे या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

कसे असणार कामाचे स्वरूप ?

हे पूर्णवेळ कामकाज नसले तरी डॉ. हर्षवर्धन यांना कार्यकाळी मंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षपदी राहण्याची आवश्यकता असेल, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. या कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात आणि यापैकी मुख्य बैठक ही जानेवारी महिन्यात होते. आरोग्य सभेनंतर त्वरीत मे महिन्यात या मंडळाची एक बैठक आयोजित करण्यात येते. तसंच आरोग्य सभेच्या सर्व नियांवर तसंच धोरणांना प्रभावी बनवण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांकडे असते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!