साताऱ्यात दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ मे २०२२ । सातारा । सातारा शहर व सातारारोड येथे झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

करंजे नाका येथे झालेल्या अपघातात मीरा चंद्रकांत ढवळे (वय ७० रा. मोळाचा ओढा) तर सातारारोड (भीमनगर) येथे मालती तुषार जाधव (वय २७ रा. बर्गेवाडी ता. कोरेगाव) असे मृत महिलेची नाव आहेत. तसेच विजया ज्ञानोबा मुळे व तुषार जाधव हे जखमी झाले आहेत. याबाबत माहिती अशी कि, मीरा ढवळे व विजया मुळे या दोघी मैत्रिणी करंजे नाका येथे रास्ता ओलांडत असताना त्यांना चारचाकी वाहनाने धडक दिली. यात मीरा यांना गंभीर जखम झाली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले मात्र, त्याची प्रकृती खालावल्याने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत मालती जाधव व तुषार जाधव यांचा साताऱ्यात हॉटेल व्यवसाय आहे. ते दररोज बर्गेवाडी ते सातारा ये-जा करत असतात. शनिवारी सकाळी ७.३० वाजता हॉटेल उघडण्यासाठी सातारला येत असताना सातारारोड (भीमनगर) येथे ट्रॅक्टरची धडक बसल्याने मालती यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तुषार यांना किरकोळ जखम झाली आहे. मालती यांच्या मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. मालती यांच्या निधनामुळे बर्गेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.


Back to top button
Don`t copy text!