
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १५ मे २०२२ । सातारा । वनवासवाडी ता.सातारा येथे जबरदस्तीने रोख 900 रुपये व मोबाईल चोरुन नेहणार्या सोमनाथ चौगुले (रा.देगाव,ता.सातारा) याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दि. 11 रोजी कमलेश रामधनी कुशवाह (वय 39, सध्या रा. एमआयडीसी, सातारा) हे वनवासवाडी परिसरातून एमआयडीकडे चालत निघाले होते. दरम्यान पाठीमागून आलेल्या चौगुले याने त्यांच्याकडील मोबाइल व रोख रक्कम 900 रूपये जबरदस्तीने चोरून नेहले होते. याबाबत कुशवाह यांनी तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने चौगुलेला अटक केली आहे.
