वाईत सराईत दुचाकी चोरट्यास अटक; ४ मोटर सायकल हस्तगत


दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२२ । वाई । वाई येथे पोलिसांनी दुचाकी चोरट्यास अटक करून त्याच्याकडून ४ दुचाकी हस्तगत केल्या.

याबाबत माहिती अशी, दि.१८ रोजी दुपारी बोपर्डी ता वाई गांवचे हद्दीतुन त्यांचे घरासमोर लावलेली हिरो होंड स्प्लेंडर मोटर सायकल नं (एम एच ११ एएफ ६३१७) ही अज्ञात चोरटयाने चोरुन नेली असल्याची फिर्याद वाई पोलीस स्टेशनला दाखल झाली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनीगुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचा-यांना आरोपीचा शोध घेणेबाबत व गुन्ह्याचे तपासाबाबत सुचना देवुन तपास कामी रवाना केले होते. गुन्ह्याचा तपास चालु असतांना माहिती मिळाली की, सदरची गाडी चोरणारा इसम एमआयडीसी वाई परिसरात फिरत आहे. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांनी बोपर्डी ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीच्या वर्णनावरुन सदर आरोपीस चोरीच्या गाडीसह पकडले. त्यानंतर आरोपीस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने वाल्हे, ता. पुरंदर जि. पुणे येथुन टीव्हीएस मोपेड गाडी, रविवार पेठ वाई येथुन हिरो होंडा कंपनीची एचएफ डिलक्स मोटर सायकल व नगरपालिका वाई समोरुन बजाज कंपनीची बॉक्सर मोटरसायकल अशा गाड्या चोरलेल्या असल्याचे सांगितले. त्यानुसार तपास करुन सदरच्या तिनही गाड्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

आरोपीकडुन एकुण ८५ हजार किंमतीच्या एकुण चार मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक शिवाजी वायदंडे हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!