कुडाळ परिसरात मोकाट फिरणारा दुचाकी चोर जेरबंद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२१ । कुडाळ । रिटायर्ड पोलीस अधिकार्‍याची गाडी पळवणारा भामटा कुडाळ पोलिसांनी जेरबंद केला आहे. राहुल दशरथ माळी वय 20 रा. तुपारी जि. सांगली असे त्याचे नाव असून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुडाळ परिसरामध्ये संशयितरित्या एकजण मोटरसायकलवरून दिसून आला. पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून रिटायर्ड पोलीस अधिकार्‍यांची दुचाकी क्रमांक MH 03 LH 155) पॅशन दुचाकी आढळली. याप्रकरणी मोटरसायकल चोरी प्रकरणी त्याच्यावर कुडाळ पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर संबंधित इसमाची अधिक तपासणी केली असता सांगली जिल्ह्यामध्ये घरफोडी यासह चोरी आदी गुन्हे देखील सदर इसमावर दाखल असल्याचे कुडाळ पोलिसांनी सांगितले दरम्यान सराईत आरोपी राहुल माळी यांच्याकडून पोलिसांच्या तपासात आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम हेडकॉन्स्टेबल घोरपडे अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!