ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; वाठार कॉलनी फाट्याजवळ अपघात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२१ । लोणंद । वाठारकॉलनी फाटा येथे मोटारसायकला ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण ठार मौजे वाठारकॉलनी फाटा ता खंडाळा गावाचे हद्दीत लोणंद ते शिरवळ जाणारे रोडवर शिवाजी श्रीरंग सांळुखे हे त्यांचे मोटारसायकल क्र . MH 11AQ 6448 वरुन वाठारकॉलनी ते भादे असे शिरवळ रोडने जात असताना वाठारकॉलनी फाटा येथे पाठीमागुन भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा कंपनीचा ट्रक MH 12 HD 3976 वरील अनोळखी चालकाने रस्त्याच्या परिस्थीती कडे दुर्लक्ष करुन हयगयीने व अविचाराने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवुन मोटारसायकलीस पाठीमागुन धडक देवुन ट्रक त्याचे अंगावरुन व मोटारसायकल वरुन घालुन त्याचे मृत्युस कारणीभुत झाला.त्याला उपचारास न नेहता व अपघाताची खबर न देता आपल्या ताब्यातील ट्रक जागेवर सोडुन पळुन गेला .

याबाबत ट्रक चालकाविरोधात बाळासाहेब हिंदुराव साळुंखे रा. भादे यांनी लोणंद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असुन लोणंद पोलीसात गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सपोनि विशाल वायकर करीत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!