सातारा रोडवरील भिषण अपघातात दुचाकीस्वार ठार


स्थैर्य, फलटण, दि.९: फलटण सातारा रस्त्यावर फरांदवाडी येथे ओहरटेक करताना कारने दुचाकीस दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सदर दुचाकीस्वाराचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला असून सचिन जयवंत जाधव वय ३० रा. आदर्की बुद्रुक तालुका फलटण असे त्याचे नाव आहे. अपघातानंतर कार चालकाने घटना स्थळावरुन पळ काढला आहे.      सोमवार दि. ८ रोजी दुपारी चारच्या सुमारास फरांदवाडी गावच्या हद्दीतील जगताप पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. फलटणकडे येणार्या टोयाटो इटीओस गाडी क्रमांक एम एच ४२ ए ए ३२२२ च्या कार चालकाने रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करुन पुढील दुचाकीस ओवरटेक करीत असताना फलटणकडून सातारा बाजूकडे निघालेली हिरो कंपनीची एच एफ डीलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच ११ सी ए ३४३२ या दुचाकीस जोरदार धडक दिली.

यामध्ये दुचाकी चालक सचिन जयवंत जाधव रा. आदर्की बुद्रुक ता. फलटण हा गंभीर जखमी झाला. परंतू जखमी जाधव यास औषध उपचारास न नेता व पोलीस स्टेशनला खबर न देता कार चालक घटनास्थळावरुन पळून गेला व जाधव यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून अज्ञात कार चालकाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत संतोष किसन शिंदे वय ४३ रा. नवामळा, ठाकुरकी ता. फलटण यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सपोनि नवनाथ गायकवाड करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!