कंटेनरला धडक बसल्याने दुचाकीस्वार ठार काशीळजवळ महामार्गावर अपघातात : एक जखमी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२१ । सातारा । ग्वाल्हेर-बेंगलोर महामार्गावर काशीळ(ता.सातारा ) गावच्या हद्दीत अज्ञात कंटेनर ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात युवक ठार झाला. शनिवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. गौरव बाळासो लोहार (वय 28, रा. काशीळ, ता. सातारा) असे मृत युवकाचे नाव आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काशीळ येथून गौरव लोहार हा त्याच्या दुचाकीवरून रात्री उशिरा निसराळेफाटा येथे आला होता.यावेळी दुचाकीवर मित्र सुमित विजय सुतार(वय.31,रा,वडणगे,कोल्हापूर हल्ली रा. काशीळ) हाही होता. निसराळे फाटा येथून हे दोघे पुन्हा काशीळकडे निघाले.

रात्री 11.45 च्या सुमारास त्यांची दुचाकी काशीळ गावच्या हद्दीत आली असता पुढे चाललेल्या अज्ञात कंटेनर ट्रकला पाठीमागून त्यांची दुचाकी जोरात जाऊन धडकली. या अपघातात गौरव लोहार हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सातारा येथे नेण्यात येत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला सुमित सुतार हा किरकोळ जखमी झाला. सोमवारी अपघाताची नोंदबोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास हवालदार मनोहर सुर्वे व किरण निकम करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!