
थेट WhatsApp वर मिळवा
फलटणच्या आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये माकड खेळल्याचा व्हिडिओ चर्चेत आला असून, प्राचार्या डॉ. वैशाली व्ही. शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 25 नोव्हेंबर : फलटण येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पटांगणात आलेल्या एका माकडाचा खेळ मोबाईलमध्ये कैद करण्यात आला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
पटांगणातील खेळ आणि व्हिडिओ
शाळेच्या पटांगणात अचानक आलेल्या माकडाने मुलांच्या खेळण्याच्या घसरगुंडीवर बसून मनसोक्त खेळ केला. कधी घसरगुंडीवरून घसरणे, कधी झुल्यावर बसणे, तर कधी जिन्याच्या कठड्यावरून फिरणे, असा त्याचा खेळ बराच वेळ सुरू होता. शाळेतील शिक्षकांनी हा क्षण मोबाईलमध्ये कैद केला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.
शाळेच्या प्राचार्या डॉ. वैशाली व्ही. शिंदे यांनी सांगितले की, “मुलांच्या अनुपस्थितीत निसर्गातील या पाहुण्याने शाळेचा आनंद लुटला. ही घटना मुलांसाठी निसर्गाशी मैत्री शिकवणारी आहे.”
या घटनेत कोणतीही हानी झालेली नसून, काही वेळानंतर माकड झाडावरून निघून गेले.


