अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । खंडाळा । खंडाळा पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील पंढरपूर फाट्यालगत अज्ञात वाहनाच्या व मोटारसायकलच्या झालेल्या धडकेत मोटारसायकलचालक सर्वेश सुरेश वहिकर (वय 47, रा. पळशी रोड, शिरवळ ता. खंडाळा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ, केसुर्डी हद्दीतील एका आंतरराष्ट्रीय खाजगी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून सर्वेश वहिकर हे होते. दरम्यान, आज बुधवार दि. 1 डिसेंबर रोजी पहाटे सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान सर्वेश वहिकर हे कंपनीमधून शिरवळ बाजूकडे मोटारसायकल क्रं. (एमएच-12-पीजे-7734) वरुन निघाले असताना शिरवळ हद्दीतील पंढरपूर फाट्यालगत असणाऱ्या एका इंजिनियरींग वर्क्सच्याजवळ महामार्गावर अज्ञात वाहनाबरोबर मोटारसायकलच्या झालेल्या अपघातामध्ये मोटारसायकलचालक सर्वेश वहिकर हे गंभीर जखमी झाले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या सर्वेश वहिकर यांना रुग्णवाहिकेमधून शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला.यावेळी अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरुन पलायन केले.

या घटनेची फिर्याद संदिप शिंगटे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ,पोलीस अंमलदार सचिन वीर हे करीत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!