‘गिरीधर सायन्स अकॅडमी’च्या १२ वीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


दैनिक स्थैर्य | दि. २६ जून २०२४ | फलटण |
फलटण येथील नामांकित व कायमच १०० % निकालाची उज्ज्वल परंपरा असणार्‍या गिरीधर सायन्स अकॅडमीच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी व मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल नेहमीप्रमाणे १०० टक्के लागला आहे. यामधील २० विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत ९० पर्सेंटाईलपेक्षा जास्त मार्क मिळाले असून जयदीप कदम या विद्यार्थीने ९९.७५ पर्सेंटाइल गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे

त्याच्या या यशाबद्दल गिरीधर अकॅडमीचे शिवराज भोईटे, मयूर भोईटे, मंदार पाटसकर यांनी विशेष अभिनंदन केले. आयडियल स्कूल इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा प्रा. डॉ. वैशाली शिंदे, संचालिका प्रा. सुनिता जाधव यांच्या हस्ते सत्कार करून कौतुक करण्यात आले. यामध्ये जयदीप कदम ९९.७५ पर्सेंटाइल, रितेश निकाळजे ९९.४२ पर्सेंटाइल, रितेश भोईटे ९७.६२ पर्सेंटाइल, निधा बागवान ९५.५२ पर्सेंटाइल, समर्थ लिपारे ९५.४२ पर्सेंटाइल, वैष्णवी शेंडे ९५.१३ पर्सेंटाइल यांचे विशेष अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक वृंद उपस्थित होता.


Back to top button
Don`t copy text!