
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । सातारा । विसावा नाका पिरवाडी ता. सातारा व येथील खेड फाटा परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. ३0 जून ते १ जुलै दरम्यान विसावा नाका पिरवाडी परिसरात असर्णाया कस्तुरी डुप्लेक्स याठिकाणी पार्किंग केलेली एमएच ११ सीएक्स २६१२ ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार राकेश सुभाष नलवडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दुसऱ्या घटनेत दि. २ जुलै ते ३ जुलै रोजी सातारा परिसरात असर्णाया खेड फाटा येथील एका कॉम्प्लेक्स मध्ये पार्किंग केलेली दुचाकी क्र. एमएच ११ एन ८७५६ अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार सुर्यकांत रायसिंग महामुलकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
