दैनिक स्थैर्य | दि. ६ एप्रिल २०२४ | फलटण |
कृषी विद्यापीठ, लुधियाना, पंजाब येथे दि. २८ मार्च ते १ एप्रिल रोजी राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. भारतातील १२८ विद्यापीठांतून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संघास २ सुवर्णपदके व ३ रौप्यपदके प्राप्त झाली. या संघात मुधोजी महाविद्यालयातील कु. अश्विनी वालकोळी हिस ‘पोस्टर मेकिंग’ स्पर्धेत प्रथम क्रमांक व सुवर्णपदक तसेच गुरुनाथ म्हातुगाडे यास व्यंगचित्र ‘कार्टूनिंग’ कला प्रकारात प्रथम क्रमांक व सुवर्णपदक प्राप्त झाले.
सदर विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठातील बबन माने सर, ललित कला प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. सदर राष्ट्रीय युवा महोत्सवात कलाविष्कार विभागप्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर संघप्रमुख म्हणून सहभागी झाले होते. सदर विद्यार्थ्यांना विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड सर, सुरेखा आडके, विजय इंगवले यांचे प्रोत्साहन लाभले.
या सुवर्ण कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख सर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर तसेच गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य पार्श्वनाथ राजवैद्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच.कदम सर, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.