दैनिक स्थैर्य | दि. ७ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण विभागाचे सर्व धारकरी ‘वडू बुद्रुक’ला बलिदान मासनिमित्त धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी गेले होते, त्यावेळी रात्री ११.३० वाजता अपघात झाला. त्यामध्ये एक धारकरी अथर्व हेंद्रे याचा जागेवरच दु:खद मृत्यू झाला.
सर्व फलटण तालुक्यातील धारकर्यांनी दुपारी १ वाजता मरण पावलेल्या धारकर्याच्या अंत्ययात्रेसाठी भैरोबा गल्ली, बुधवार पेठ, फलटण येथे उपस्थित रहावे.
धारकरी अथर्व हेंद्रे याच्या मृत्यूबद्दल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, फलटण विभाग यांनी शोक व्यक्त केला आहे.