स्थैर्य, सातारा, दि. 19 : जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित म्हणून उपचारासाठी दाखल असलेले तीन रुग्ण उपचारांती बरे झाल्याने त्यांना आज सोडण्यात आले.जिल्हा रुग्णालयात त्या तिघांनी लढा दिल्याबद्दल गुलाब पुष्प देऊन त्यांचे वैधकीय अधिकारी यांनी त्यांना निरोप दिला.दरम्यान, त्या कैद्यांना न्यायालयाने जामीन दिल्याने ते जिल्हा कारागृहाऐवजी त्यांच्या घरी गेल्याचे समजते.कोरेगाव तालुक्यातील जो एक रुग्ण बरा झाला त्याचे गावकयांनी स्वागत केले नाही परंतु त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
कोरोनाचा आकडा फुगत चालला आहे.तेवढेच रुग्ण बरे होऊन बाहेर पडत आहेत.क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना बाधित म्हणून उपचारासाठी दाखल झालेले पहिले दोन कैदी जे बाहेरून पुणे येथून सातारा कारागृहात आणले होते.त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार झाले. उपचार सुरू असतानाच त्यांना न्यायालयाने जामीन दिल्याचे जिल्हा कारागृहातुन सांगण्यात आले.त्या दोन कैद्यांनी कोरोनावर मात करून ठणठणीत बरे झाले.त्यांना जिल्हा रुग्णालयातून आज सोडण्यात आले.जामीन दिला गेल्याने ते जिल्हा कारागृहात न जाता ते आपल्या नातेवाईकांसोबत आपल्या गावी गेल्याचे समजते. तर कोरेगाव तालुक्यातील पहिला जो रुग्ण आढळून आला होता. तो कराड तालुक्यात कामाला होता.कराड ते कोरेगाव तालुक्यातील सोनके या गावी तो गेल्याने लगेच त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.अतिशय बिकट परिस्थिती गावाच्या बाहेर घर असलेला हा रुग्ण अगोदरच परिस्थितीशी झुंजत आहेत.त्यातच कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच कुटूंबावर मानसिक ओझे होते.मात्र, तो बरा होऊन आल्याने गावात जरी स्वागत केले नसले तरी कुटूंबाच्या सदस्यांना बरे वाटले.14 दिवस घरातच कोरोनटाईन होणार असल्याचे समजते.