कास पठारावर मोकाटपणे फिरणाऱ्यांना पोलिसांनी कारवाई करून हिसका दाखवला


४५ वाहनांवर कारवाई रू. १७,७०० दंडात्मक रक्कम वसूल 

स्थैर्य, सातारा, दि. १९ : कास पठारावर लाँकडाऊनच्या काळात मोकाटपणे फिरणाऱ्यांना पोलिसांनी कारवाई करून हिसका दाखवला.  ४५ वाहनांवर कारवाई करत रू. १७,७०० दंडात्मक रक्कम वसूल केली. आता लाँकडाऊन काळात सतत कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांनी सांगितले.कोरोनाची धास्ती वाढत असताना अनेक जण भामटेगिरी करत कास पठार आणि परिसरात भटकंती करण्यासाठी फिरताना दिसतात.

कोरोनाचे गंभीर संकट असताना ही मोकाटपणे फिरणाऱ्यांना आवरा, असे नागरिकांची भावना व्यक्त होत होती. सातारा तालुका पोलिसांनी सोमवारी मोटार वाहन कायद्यानुसार ४५ वाहनांवर कारवाई पोलीस नाईक सुहास पवार, पोलीस नाईक रमेश शिखरे यांनी केली.लाँकडाऊन काळात यापुढेही कोणीही विनाकारण कास पठार, ठोसेघर परिसरामध्ये फिरण्यासाठी येऊ नये. सापडला की कारवाई होणार. घरीचं सुरक्षित रहा, काळजी घ्या,’ असे आवाहन सातारा पोलिसांच्या कडून करण्यात आले आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!