
दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन जण बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२८ जुलै रोजी १ वाजण्याच्या सुमारास लोणंद, ता. खंडाळा गावच्या हद्दीत शिरवळ चौक परिसरातून बापूराव पोपट शेळके, वय ३८, रा. मांडर, ता. पुरंदर हे हात दुखत असल्याने लोणंद येथील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाऊन येतो असे सांगून निघून गेले ते अद्याप घरी परत न आल्याची तक्रार त्यांची पत्नी स्वप्नाली बापूराव शेळके यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसऱ्या घटनेत, दि.३१ जुलै रोजी ३ वाजण्याच्या सुमारास वडूज तालुका खटाव गावच्या हद्दीतून इनसुर हिमान शेख, रा. जळगाव, जि. जळगाव हे जळगाव येथे जातो असे सांगून निघून गेले मात्र ते तेथे पोहोचले नसल्याची तक्रार इरफान अमीर सय्यद यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे.