दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२५ | फलटण | फलटण येथील सगुणामातानगर येथे असलेल्या ‘जय मोटर्स’ या शोरूमच्या गेटजवळ दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजण्याच्या सुमारास दोन मुले आपापसात भांडणे करत असताना शोरूममधील कर्मचारी ओमप्रकाश उदयसिंह धुमाळ (वय ३१, रा. मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण) यांनी त्या मुलांना गेटच्या बाहेर जाऊन भांडणे करा, असे सांगितल्यावरून त्या मुलांनी दगडफेक करून शोरूममधील गाड्यांचे नुकसान केले. तसेच फिर्यादी ओमप्रकाश धुमाळ यांना दगड मारून जखमी केले आहे.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलासोबत व त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.