आरटीओ चौकात अज्ञातांकडून टपर्‍यांची तोडफोडदोन लाखांचे नुकसान : व्यावसायिकांमध्ये खळबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ९:  आरटीओ चौकात अज्ञातांकडून आठ ते दहा टपर्‍यांची नासधूस करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. काही टपर्‍या रस्त्यावर टाकून देण्यात आल्या होत्या. यामध्ये अंदाजे 2 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सातारा येथील आरटीओ चौकातील बर्‍याच टप्यांची नासधूस झाल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले. यामध्ये बहुतांश चहा व खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. काही टपर्‍यातील साहित्यांची अज्ञातांनी नासधूस केली. काही टपर्‍या तर मूळ जागेपासून हटवून रस्त्यावर टाकून देण्यात आल्याचे समोर आले. या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची माहिती शहर पोलिसांना मिळाली मात्र रात्री उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल झाला नव्हता.
आरटीओ चौकातील काही टपर्‍यांना राजकीय आश्रय असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच अजिंक्य गणपती चौक ते ऑफिसर्स क्लबच्या मार्गावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिछाडीला टपर्‍यांची गर्दी झाली आहे. या टपर्‍यांवर दहा महिन्यापूर्वी सातारा पालिकेने धडक कारवाई करून आरटीओ रस्ता मोकळा केला होता. तसेच पुन्हा येथे मोठे अतिक्रमणं होऊ नये याकरिता मोठा चर खणला होता. या कारवाई नंतर आठवडयाच्या आतच काही टपरी चालकांनी या जागेवर अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणांना राजकीय वरदहस्त असल्याने येथे पालिकेची कधीच कारवाई होत नाही. जर कारवाई झालीच तर पालिका प्रशासनावर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो.

Back to top button
Don`t copy text!