सोनाली श्रद्धा |
स्थैर्य, सातारा, दि.२७: सातारच्या कबड्डी क्षेत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप,भारतीय कबड्डी संघाच्या प्रशिक्षणासाठी सातारच्या श्री शिवाजी उदय मंडळाच्या 2 खेळाडूंची ऑनलाइन कोचिंग साठी निवड सोनाली हेळवी सिनियर इंडिया व श्रद्धा धायगुडे ज्युनियर इंडिया साठी निवड आणि महत्वाचे सांगायचे झाले तर या दोन्ही मुली ग्रामीण भागातून आहेत,ग्रामीण भागात कौशल्य प्रचंड आहे फक्त गरज आहे त्या खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन व एक प्लॅटफॉर्म मिळणे गरजेचे आहे आणि सातारच्या श्री शिवाजी उदय मंडळाने तेच केले ग्रामीण भागातून गुणवान खेळाडू शोधून त्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन करून आज ते खेळाडू भारतीय स्तरावर चमकत आहेत गुरुवर्य बबनराव उथळे यांनी जो सातारच्या मातीत क्रीडा क्षेत्रात जो पाया रचला त्या साठी त्यांना शतशः धन्यवाद…सोनाली हेळवी ही कराडच्या शेरे येथील मूळ गाव ची आहे तर श्रद्धा खंडाळा तालुक्यातील सुखेड गावची कन्या आहे,सातारा जिल्हा शुरांचा वीरांचा जिल्हा ऐतिहासिक वारसा संतांची भूमी निसर्गाने भरभरून दिलंय साताऱ्याला…आणि ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या सारखे मातब्बर खेळाडू घडविलेला सातारा जिल्हा डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्यापासून ललिता बाबर यांच्यासारखे अनेक गुणवान खेळाडू सातारा जिल्ह्यात घडले सोनाली व श्रद्धा हीच परंपरा कायम राखतील व सातारच्या क्रीडा क्षेत्राची सुवर्ण परंपरा अखंडित ठेवतील या दोन्ही खेळाडू सातारच्या श्री शिवाजी उदय मंडळ सातारा च्या मातीत घडल्या याचे एक प्रशिक्षक म्हणून खूप अभिमान वाटतो..ह्या खेळाडूंना गुरुवर्य बबनराव उथळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे सातारा जिल्हा कबड्डी असो चे पदाधिकारी उत्तमराव माने,भरत गाढवे,संग्राम उथळे,विजय आगटे, नारायनदास दोशी,सुरेश पाटील,यांनी अभिनंदन केले व तिचे प्रशिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक शशिकांत यादव समीर थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.
> ओबीसी जनमोर्चाचे आमदार दीपक चव्हाणांना निवेदन