
स्थैर्य, कशेडी, दि. 28 : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दोन कारमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन या दोन्ही वाहनातील चालक किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास धामणदेवी गाव हद्दीत घडली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी की, पुण्याकडून खेड दिशेने जाणारी कार क्रमांक (MH १४ CS १८३८) आणि समोरुन येणारी (सिंधुदुर्ग ते मुंबईकडे जाणारी) इनोव्हा कार क्रमांक (MH०१ CR ००६८) यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.
या अपघातात दोन्ही कारमधील चालक मंगेश शांताराम कदम (वय ४०, रा. चिंचघर, वेताळवाडी खेड) व समीर विष्णू तावडे (वय ३९, रा. लालबाग, मुंबई) किरकोळ जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती कशेडी पोलिसांना समजताच कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सहाय्यक फौजदार मधुकर गमरे यांनी पोलिस कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेस पाचारण करून दोन मी जखमी चालकांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.