मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दोन कारची समोरासमोर धडक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, कशेडी, दि. 28 : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दोन कारमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन या दोन्ही वाहनातील चालक किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास धामणदेवी गाव हद्दीत घडली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी की, पुण्याकडून खेड दिशेने जाणारी कार क्रमांक (MH १४ CS १८३८)  आणि समोरुन येणारी (सिंधुदुर्ग ते मुंबईकडे जाणारी) इनोव्हा कार क्रमांक (MH०१ CR ००६८) यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.

या अपघातात दोन्ही कारमधील चालक मंगेश शांताराम कदम (वय ४०, रा. चिंचघर, वेताळवाडी खेड) व समीर विष्णू तावडे (वय ३९, रा. लालबाग, मुंबई) किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती कशेडी पोलिसांना समजताच कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सहाय्यक फौजदार मधुकर गमरे यांनी पोलिस कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेस पाचारण करून दोन मी जखमी चालकांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!