स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोघे जेरबंद, एलसीबीची कामगिरी : देशी बनावटीच्या पिस्टलप्रकरणी 3 काडतुसे हस्तगत 

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 8, 2021
in सातारा - जावळी - कोरेगाव
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा, दि.७: सुर्ली, ता. कराड येथील बस स्टॉपवर एकजण गावठी पिस्टल बाळगून  असणार्‍या एकास सातारा एलसीबीच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून गावठी पिस्टल व 3 जीवंत काडतुसे असा 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच त्याच्याकडे ज्याने पिस्टल ठेवण्यास दिले तोही गंभीर गुन्ह्यात फरार असल्याचे समजले. त्यानंतर दुसर्‍या संशयितासही वांगी, जि. सांगली येथून पोलिसांनी अटक केली. अमोल जगन्नाथ माने, वय 32 रा. वनवासमाची ता.कराड, संभाजी संपत मदने, रा. बनवडी कॉलनी, ता. कराड (फरार) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, सुर्ली, ता. कराड येथील बसस्टॉप जवळील परिसरामध्ये एकजण गावठी पिस्टल बाळगलेल्या स्थितीत फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. यानंतर या पथकाने सुर्ली,  बसस्टॉप येथे दि. 6 रोजीचे सायंकाळी 5.25 वा. सुमारास संशयितास पकडून त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या ताब्यात एक गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतूस असा एकुण 65 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदर पिस्टल व काडतूस दुसर्‍या एकाने त्याच्याकडे ठेवण्यास दिले आहे, असे सांगितले.

या अनुषंगाने खात्री केली असता ज्याने पिस्टल ठेवण्यासाठी दिले होते, तो संशयित कराड तालुका पोलीस ठाण्यातील खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नोव्हेंबर 2020 महिन्यापासून फरार असून तो वांगी, जि. सांगली याठिकाणी असल्यासचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी जावून सापळा लावून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. या दोन्हीही आरोपीविरुध्द कराड तालुका पोलीस ठाण्यास भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनांप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, सपोनि आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार जोतीराम बग, उत्तम दबडे, हवालदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कचरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, रवींद्र वाघमारे, मंगेश महाडीक, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, राजकुमार ननावरे, रोहित निकम, सचिन ससाणे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, केतन शिंदे यांनी ही कारवाई केली.


ADVERTISEMENT
Previous Post

32 वर्षीय अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक; पोर्न व्हिडिओ बनवून वेबसाइटवर अपलोड करण्याचा आरोप

Next Post

वहागाव जवळ भीषण अपघातात चार ठारभरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक, 1 गंभीर

Next Post

वहागाव जवळ भीषण अपघातात चार ठारभरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक, 1 गंभीर

ताज्या बातम्या

फलटण तालुक्यातील १८ तर सातारा जिल्ह्यातील २२४ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु

March 5, 2021

फलटण – लोणंद रोडवर अपघात; दोघे जखमी

March 5, 2021

आई-वडिल मारतील म्हणून घरात चोरी झाल्याचा बनाव, अकरा वर्षाच्या मुलाचा प्रताप

March 5, 2021

कोल्हापूर, बारामतीतील उद्योजकांवर हनी ट्रॅप

March 5, 2021

पतीला मारहाण, पत्नीचा विनयभंग

March 5, 2021

हलगर्जी मृत्यूप्रकरणी गुन्हा

March 5, 2021

ग्रेड सेप्रेटरमध्ये स्टंटबाजी अंगाशी आलीदुचाकीस्वार युवकावर गुन्हा दाखल 

March 5, 2021

परदेशी नागरिक कायदा उल्लंघनप्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर पाचगणी पोलिसांत गुन्हा 

March 5, 2021

विवाहितेचा जाचहाटप्रकरणी पतीसह सासरच्या 6 जणांवर गुन्हा 

March 5, 2021

गोडोली येथून दुचाकी चोरीस

March 5, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.