
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ५ जुलै २०२१ । मुंबई । विधानपरिषदेचे माजी सदस्य व माजी मंत्री नरेंद्र मारुतराव कांबळे, माजी सदस्य संभाजीराव साहेबराव काकडे, धरमचंद कल्याणमल चोरडिया यांना आज विधानपरिषदेत शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेत शोकप्रस्ताव मांडून भावना व्यक्त केल्या.
