छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०४ एप्रिल २०२३ । मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळयास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!