माजी आमदार पास्कल धनारे यांच्या निधनाने आदिवासींचा सेवक गमावला – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी अर्पण केली श्रद्धांजली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि. १२: भारतीय जनता पार्टीचे पालघरचे माजी जिल्हाध्यक्ष आणि डहाणूचे माजी आमदार पास्कल धनारे यांच्या निधनाने पक्षाने आदिवासी समाजाचा सेवक गमावला आहे, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी अर्पण केली.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पास्कल धनारे यांच्या अकस्मिक निधनाने धक्का बसला. त्यांनी दीर्घकाळ पक्ष संघटनेत कार्य केले होते. पालघरचे भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाच्या विस्तारात योगदान दिले होते. तत्पूर्वी जिल्हा सरचिटणीस तसेच तालुका पातळीवरील पदांवर काम करताना त्यांनी पक्षाचा जनाधार बळकट करण्यासाठी कार्य केले होते. डहाणू या कम्युनिस्टांच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात त्यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे विजय मिळविला होता. आदिवासींच्या प्रश्नांबाबत त्यांना तळमळ होती. आपण त्यांना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!